Cyber Crime: अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मेसेजेच पाठवायचा अन्... शिक्षकाचे कारनामे वाचून व्हाल थक्क

Gondia Crime: सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागू आहे. त्यातून सध्या गोंदिया जिल्ह्यात (Gondia) असाच एका धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा (Cyber Crime) प्रश्न पुढे आला आहे. 

Updated: Mar 15, 2023, 07:28 PM IST
Cyber Crime: अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मेसेजेच पाठवायचा अन्... शिक्षकाचे कारनामे वाचून व्हाल थक्क title=
a professor in morgaon school used to send vulgur clips for molestation crime news in marathi

Gondia Crime: सध्या समाजात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यातून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण (Sexual Molestation), त्यांना अश्लील (Vulgur Clips) तसेच घाणेरड्या क्लिप्स पाठवणे. त्यातून त्यांचा मानसिक छळ करणे आणि शिक्षणाच्या नावाखाली त्यांचे शारीरिक शोषण करणे अथवा लैंगिक छळ (Sexual Harrasment) करणे असे प्रकारही होताना दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे ज्यातून पुन्हा एकदा विद्यार्थींनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरूण मुलींना अश्लील फिल्म्स पाठवन त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्यांनाबद्दल अनेक लिहिले आणि बोलले जाते. सध्या पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती घटताना दिसते आहे. राज्यातही असे प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या अशा काही घटनांना (Gondia News) आळा घालणे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. 

गोंदिया जिल्ह्यात सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे त्यातून एका अल्पवयीन मुलीचा छळ करण्याचा प्रयत्न एका शिक्षकाकडून करण्यात आला आहे. या घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. या आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून समोर आलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाला 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत (Court Jail) सुनावण्यात आली आहे. 

काय घडला प्रकार?

मागच्या काही महिन्यांपासून असे प्कार वारंवार होताना दिसत आहेत त्यामुळे या घटनांनी तरूण आणि खासकरून अल्पवयीन मुलींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित तरूणी ही मोरगाव तालुक्यातील एका नावाजलेल्या विद्यालयात नववीत शिकत होती. या शाळेतील शिक्षकानं तिचा लैंगिक छळ करायला सुरूवात केली. हा शिक्षक पीडित मुलीची आणि तिच्या मैत्रीणीची छेड काढायचा. तिला तो अनेकदा पाठीवरनं हात फिरवायचा आणि तिला अश्लील स्पर्श करायचा. त्यानंतर हा प्रकार वाढतच गेला. त्यानंतर त्यानं कुठूनतरी तिचा मोबाईल नंबर शोधून काढला आणि मग तिला वाईटसाईट अश्लील मेसेजही पाठवू लागला. 

या मुलीसोबत तो फ्लर्टिंग (Filrting) करू लागला आणि तिला तू खूप सुंदर आहेस, तु मला आवडतेस म्हणत नको नको ते मेसेज करू लागला. त्यानंतर हा सगळा प्रकार तिनं आपल्या पालकांना सांगितला आणि त्यांनी वेळीच पोलिसांकडे पुराव्यानिशी गुन्हा दाखल केला, त्यातून त्याच्या बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर गुन्ह्यात वाढ

सध्या समाजात नाना तऱ्हेचे गुन्हे घडताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे लैंगिक छळ (Cyber Crime) आणि शोषण. सध्या मुलींना शाळा, कॉलेजसारख्या ठिकाणी जिथे शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले जाते अशा ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते आहे. त्यातून सायबर गुन्ह्यांमध्ये जास्त वाढ होते आहे.