मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

मेट्रो सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवलेत.

Updated: Jan 19, 2024, 11:14 PM IST
मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक title=

Pune Metro News:   पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील एका मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावले आहेत. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षा रक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला. 

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक 2 वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळताना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले.  पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले.  त्यामुळे  स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या.

यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ 30 मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.  सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी  कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

एका ट्रकने तीन कार आणि सहा बाईकना चिरडले

संभाजीनगर मध्ये पैठण रोडवर वाल्मी नाकाजवळ भीषण अपघात झालाय,  एका ट्रकने तीन कार आणि जवळपास सहा दुचाकींना चिरडले आहे. पैठण रोडवर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ट्रॅफिक जाम होती त्यात हा ट्रक धुळे सोलापूर हायवे वरनं येत असताना वाल्मी नाकाच्या एक्झिट जवळ उतरला तिथे उतार होता ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्राफिक जाम मध्ये अडकलेल्या लोकांवर हा ट्रक धडकला. या अपघातात दुचाकींचा अक्षरशः चूराडा झालेला आहे तर, कारही पुरत्या उध्वस्त झालेल्या आहेत. तर, एक रिक्षाही ट्रकच्या धडकेत उलटला आहे. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तीन जण गंभीर जखमी आहेत. तर, चार जण किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, पैठण रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.