Maharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

Bharat Jodo Yatra Maharastra:  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही. 

Updated: Nov 18, 2022, 10:44 PM IST
Maharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात... title=
Aaditya Thackeray On Rahul Gandhi

Aaditya Thackeray On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावकर (Savarkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशभर गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता त्याचे पडदास राज्यातील राजकारणावर (Maharastra Politics) देखील पहायला मिळत आहे. त्यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही. त्यावर आता आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मी देखील सहमत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण आपण सगळे 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं यावर सगळे भांडायला लागलो, असंच राहिलं तर भविष्यासाठी कोण भांडणार?, असा सवाल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray on Rahul Gandhi Statement) यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा - Maharastra Politics: "राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, हे कायद्याचं राज्य..."

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (Aaditya Thackeray in Bharat Jodo Yatra) ठाकरे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. खुद्द आदित्य ठाकरे देखील यात्रेत (Aaditya Thackeray With Rahul Gandhi) सामील झाले होते. मात्र, सध्या सावरकर यांच्यावरील वक्तव्यानंतर शिवसेना कुस बदलणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.