विनयभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या, संशयिताच्या घरात घुसून नासधूस

 तरुणीने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. तीन जणांनी तरुणीचा विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दरम्यान, गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

Updated: Oct 31, 2020, 02:43 PM IST
विनयभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या, संशयिताच्या घरात घुसून नासधूस

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात तरुणीने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. तीन जणांनी तरुणीचा विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, नणुन्द्रे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

ही घटना समोर आल्यानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपींच्या घरात घुसून नासधूस केली आहे. त्यानंतर एका संशयित आरोपीने घाबरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंपूर्ण घटनेनंतर नणुन्द्रे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.