आंबेगावात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

गुरुवारी सायंकाळच्या मंचर-बेल्हे रोडवरील कार फाटा इथं हा भीषण अपघात घडलाय

Updated: Dec 13, 2019, 09:07 AM IST
आंबेगावात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

हेमंत चापुडे, झी २४ तास, पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये एका अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. मालवाहतूक करणारी पिकअप गाडी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी गाडी यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. 

अपघातग्रस्त रिक्षा
अपघातग्रस्त रिक्षा

 

या अपघातात अनिता बबन कदम या ७० वर्षीय महिला, प्रतिक्षा यशवंत जाधव (१८ वर्ष) ही कॉलेज विद्यार्थीनी आणि आर्यन रमेश घायतडके (५ वर्ष) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 

तर या अपघातात चालक प्रसाद सुतार व प्रतिक्षा नथू वाघ या दोघांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. जखमींवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.