शिवशाही-ट्रक एकमेकांना धडकले, बस चालक जागीच ठार

जखमींवर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू

Updated: Oct 5, 2018, 09:01 AM IST
शिवशाही-ट्रक एकमेकांना धडकले, बस चालक जागीच ठार title=

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात झालाय. किणी टोल नाक्यावर रात्री सव्वा दोन वाजल्याच्या सुमारास सावंतवाडीला जाणाऱ्या शिवशाही बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा बाहक सागर परब याचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह १६ प्रवासी जखमी झालेत.

जखमींवर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.