सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

अल्टो कार आणि ट्रकची धडक

Updated: Feb 24, 2019, 04:25 PM IST
सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार title=

बीड : सोलापूर - औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडपासून जवळ असलेल्या पाली येथे हा भीषण अपघात झाला.

भरधाव अल्टो कारने ट्रकला धडक दिली. कार आणि ट्रकच्या धडकेत हा अपघात झाला. अपघातात अल्टो कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातातील मृत महिलेचं लग्न ठरलेले होते त्यावेळी गावाकडे येत असताना हा अपघात झाला. सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातप्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथे मुंबई-आग्रा महामार्गावरही अपघात झाला आहे. दोन आयशरला हा अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून तर 25हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना पिंपळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.