Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर

Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)

Updated: Nov 22, 2022, 10:40 AM IST
Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर title=

Measles has spread in Nashik : मुंबईत गोवरच्या (Measles) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. गोवरचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (Measles Outbreak in Nashik)

चार बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला

संशयित चार बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या लॅबमध्ये पाठविले आले आहेत. लहान बालकांची काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. (अधिक वाचा - Crime News : Love Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू)

18 वर्षांवरील दोन संशयित रुग्ण 

गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. 18 वर्षांवरील दोन संशयित रुग्ण आढळून आलेत. लहान मुलांप्रमाणेच 70 वर्षांवरील ज्येष्ठांनाही गोवरची लागण होण्याची शक्यता निर्माण झालीय. बालकांचं लसीकरण सुरु आहे. मात्र वयोवृद्ध व्यक्तींना सध्या तरी कुठलीही लस देण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. वृद्धांना मधुमेह किंवा रक्तदाब असल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. मुंबईतील गोवरचा वाढता धोका लक्षात घेता ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झालीय. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय अ‍ॅक्शन मोडवर

मुंबईसह राज्यातल्या विविध भागात गोवरचा उद्रेक पाहायला मिळतोय. (Measles Outbreak in Mumbai) त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. सहा महिन्यांच्या बालकांनाही आता गोवरची लस देण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. सध्या गोवरची लस देण्याची वयोमर्यादा ही 9 महिने आहे. पण ती 3 महिन्यांनी कमी करुन सहा महिन्यांपर्यंत आणण्याचा विचार सुरु आहे. शून्य ते नऊ महिन्यांच्या आतल्या म्हणजे लसीकरण न झालेल्या बालकांना संसर्ग होत असल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.