राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, घाटकोपरनंतर आता नाशिकमध्ये हनुमान चालिसा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा 'हा' इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात

Updated: Apr 4, 2022, 09:47 AM IST
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, घाटकोपरनंतर आता नाशिकमध्ये हनुमान चालिसा title=

नाशिक : मी धर्मविरोधी नाही पण धर्माभिमानी आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा मात्र, धर्म घरात ठेवावा. रस्त्यावर आणू नका. मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. कुठून आले ते, कोणत्या नियमात लिहिलंय? हे भोंगे काढावेच लागतील. नाही काढले तर.. आताच सांगतोय.. मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू..

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा 'हा' इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली. साक्षी गणपती इथं मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लाऊडस्पीकर लावत साक्षी गणपती परिसरात हनुमान चालिसाचं पठण केलं. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा 'हा' इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केली आहे. काल चांदिवली येथील मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयासमोर लाऊडस्पीकर लावले होते.