महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्र

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 12, 2024, 09:49 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्र  title=

Sanjay Rathod Bhavna Gavli : राजकारणात कधीही काहीही होऊ शकत. एकमेकांचे वैरी असलेले राजकारणी कधीही एकत्र येवू शकतात. याचा प्रत्यय आणणारी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला आहे. एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन दिग्गन नेते एकत्र आले.  वाशिममध्ये हा राजकीय चमत्कार पहायला मिळाला आहे.  

वाशिममध्ये आमदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले असल्याचं दिसून आलंय.. दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. भावना गवळी आणि राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. यावर राठोडांना विचारले असता आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलंय.

शिवसेना शिंदे गटांचे आमदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वाशिम यवतमाळ शहरामध्ये लावलेल्या दोघांमध्ये बॅनरवार  देखील पाहायला मिळाल असून दोघांमध्ये प्रचंड एकमेकांविरुद्ध नाराजीचा सूरही उमटत होता. मात्र, आज वाशिम मध्ये पालकमंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता नियोजन भवन येथे भावना गवळी व संजय राठोड यांची दिलखुलास चर्चा झाली आहे.

महायुतीच सरकार आणण्यासाठी आमदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले असल्याचं दिसत असून दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर मंत्री संजय राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्यात कुठलेही मतभेद नव्हते लोकप्रतिनिधी होण्याअगोदर आम्ही एकत्र होतो. पुढे सुद्धा आम्ही एकत्र राहून कामं करू, आमची महायुती अधिक घट्ट आहे.तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी लोकहिताचं कामं केलं त्यामुळे येणार सरकार आमचं राहील अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी वाशिम येथे आलें असता दिली.