गौप्यस्फोटानंतर फडणवीस आणि अजितदादा पुन्हा एकत्र

फडणवीस आणि अजित दादांमध्ये २० मिनिटं चर्चा

Updated: Dec 8, 2019, 11:08 PM IST
गौप्यस्फोटानंतर फडणवीस आणि अजितदादा पुन्हा एकत्र

सोलापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होतं सोलापूरमधील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाचं. सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर फडणवीस आणि अजित पवार रविवारी पहिल्यांदाच एकाच ठिकाणी आले. त्यावेळी दोघांनी शेजारी शेजारी बसून २० मिनिटं एकमेकांशी गप्पा मारल्या. या केमिस्ट्रीची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. विवाह कार्यक्रमानिमित्त प्रथमच ते एकत्र आले.

आज सगळीकडेच चर्चा होती ती झी २४ तासवरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीची. सगळ्या पेपरच्या हेडलाईन्स होत्या त्या झी २४ तासनं घेतलेल्या मुलाखतीच्याच. सत्तासंघर्षातल्या त्या रात्री नेमकं काय घडलं, याचं सविस्तर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत दिलं आणि एकच खळबळ उडाली. खरंच पवारांना हे माहीत होतं का?

एका रात्रीत घडलेल्या शपथविधीच्या घडामोडीबद्दल फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अजित पवारांनी हे पवारांच्या कानावर घातलं होतं. 

अजित पवार अचानक उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात, दोन दिवसांत राजीनामा देतात,त्याच रात्री सिल्व्हर ओकवर परततात. एवढं सगळं होऊन अजित पवार म्हणतात... छे. मी बंड केलंच नव्हतं. 

पडद्यामागे नेमकं घडलं काय?, शरद पवारांना अजित पवारांच्या या सो कॉल्ड बंडाबद्दल माहीत होतं का? या प्रश्नांची अजूनही ठोस उत्तरं मिळालेली नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत आणखी एक ट्रेलर रिलीज केला आहे.

पाहा संपूर्ण मुलाखत