दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : एकनाथ खडसे-अजित पवार यांची अनोखी युती आज विधानसभेत पाहायला मिळाली. खडसेंचे 'दादां'ना साथ द्या धोरणाने सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानसभेत खडसे आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन काही मुद्यांवर सरकारला अडचणीत आणले आहे..
- एकनाथ खडसेंचा पुन्हा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
- ऊसाच्या आणि साखर कारखान्याच्या प्रश्नावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
- अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला खडसेंची साथ
- ऊस घेण्याबाबत कारखान्यांना अंतराची घातलेली अट रद्द करण्याची खडसेंचा विधानसभेत मागणी
- आयात - निर्यात धोरणंही वारंवार बदलत आहेत
- सरकारच्या भूमिकेमुळे मागील वर्षापासून साखर कारखान्याने अडचणीत आले आहेत, पुढील वर्षी कारखाने बंद होतील आणि मग शेतकर्यांनी ऊस कुठे घालायचा
- मंत्र्यानी एका ओळीत उत्तर देऊ नका
- पाकिस्तानमध्ये साखरेचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले आहे, त्यांनी साखरेला अनुदान दिले आहे, त्यामुळे ती साखर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात येईल आणि इथले साखर कारखाने अडचणीत येतील
- त्यामुळे सरकारने साखरेवर आयात शुल्क आकारावे
- साखरेवर आयात शुल्क वाढवण्याबाबत केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल.
हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच अडचणीत आणले आहे. खडसे यांना विरोधकांकडून बळ मिळत आहे. त्यामुळे आता भाजप सरकार काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेवरून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत आहे. खडसेंना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारची टोल मुक्त घोषणा डोकेदुखी ठरलेय.
आज विधानसभेत ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना खडसे यांनी टोलमुक्त महाराष्ट्र धोरणाबाबत शंका उपस्थित केली होती.
- टोल फ्री महाराष्ट्र हे धोरण सरकारने मागे घेतले आहे का?
- एकनाथ खडसेंचा विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सवाल
- ज्या रस्त्यांवर टोल बंद केले आहेत त्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचाही खडसेंचा आरोप
- माजी महसूल मंत्र्यांनी आजी महसूल मंत्र्यांना टोल फ्री महाराष्ट्र घोषणेबद्दल विचारले आहे
- ही टोल फ्री महाराष्ट्र घोषणा अंमलात येणार आहे का?
- अजित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल,
- अजित पवार यांची एकनाथ खडसेंना साथ
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले की, आम्ही राज्यात ३० हजार कोटीचे १० हजार किलोमीटरचे रस्ते हायब्रिड अॅन्युटीवर बांधणार आहोत. मात्र, या रस्त्यावर टोल लागणार नाही, असे ते म्हणालेत.