Maharashtra Politics : राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत...अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केलीये...विधानसभेमध्ये 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असं सांगितलं होतं...आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणालेत. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय. नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं.
महायुतीमध्ये लोकसभेला राष्ट्रवादीच्या पदरात कमी जागा आल्यानं पक्षात नाराजीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघ्या 5 जागा मिळाल्या. त्यापैकी 2 उमेदवार आयात करावे लागले. शिरूरमध्ये शिंदे गटातून आलेल्या आढळराव पाटलांना, धाराशीवमध्ये भाजप आमदाराच्या पत्नी अर्चना पाटलांना उमेदवारी द्यावी लागली. परभणीची राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा रासपच्या जानकरांना देण्यात आली. अमित शाहांनी नाव सुचवूनही नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही.
यामुळंच विधानसभेच्या दृष्टीनं आतापासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोर्चेबांधणी सुरू केलीय. दरम्यान, विधानसभेसाठी आधीपासूनच काळजी घेतली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिलीय. युती करून निवडणुका लढवायच्या तर तडजोडी कराव्याच लागलात.. मात्र हक्काच्या जागा सोडणारी तडजोड कुणालाही नको असते.. लोकसभेला केलेली तडजोड आता विधानसभेला होणार नाही असा दादागिरीचा इशाराच राष्ट्रवादीनं दिलाय... महायुतीचे बाकीचे घटकपक्ष ही दादागिरी खपवून घेणार का, हा आता सवाल आहे.
2004 बद्दल पवारांनी केलेलं वक्तव्य धादांत खोटं होतं. त्यावेळेला सीएमपदासाठी मी इच्छुक नव्हतो...मात्र, भुजबळांनी राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचवली होती...त्यामुळे भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं...मात्र, तसं झालं नाही असा गौप्यस्फोट अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलाय...2004 साली राष्ट्रवादीचा सीएम झाला असता तर पक्ष फुटला असता असं विधान पवारांनी केलं होतं...त्यावर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय...