सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं; अजित पवार यांचा गौतमी पाटीलला सल्ला

 Gautami Patil : अजित पवारांनी पुन्हा एकदा गौतमी पाटीलबाबत विधान केले. सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं, असा टोला अजित पवारांनी गौतमी पाटीलला लगावला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 25, 2023, 06:39 PM IST
सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं; अजित पवार यांचा गौतमी पाटीलला सल्ला title=

Ajit Pawar On Gautami Patil : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा लावणी डान्सर  गौतमी पाटील (Gautami Patil) वर निशाणा साधला आहे. आपल्या खास शैलीत अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या नृत्यशैलीवर टीकास्त्र सोडले आहे. यापूर्वी देखील अनेकदा अजित पवार यांनी गौतमीला टार्गेट केले होते. गौतमीने अजित पवार यांची जाहीरपणे माफी देखील मागितली होती. अजित पवार मात्र, गौतमी पाटीलबाबत त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. 

सगळ्यांना पाहता यावं असं काम कराव - दादांचा गौतमीला टोला

अजित पवार सॉफ्ट आहेत असे आरोप केले जातात. मात्र विरोध करतानाही सभ्यता पाळावी अशी शरद पवार यांची शिकवण आहे, असं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले.  इतकंच नाही तर अजित पवारांनी पुन्हा एकदा गौतमी पाटीलबाबत विधान केले. सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं, असा टोला अजित पवारांनी गौतमी पाटीलला लगावला. साहेबांवर अनेक वेळा अनेक आरोप झाले जे शक्ती स्थळ असतं त्याच्यावरच आरोप जास्त केले जातात गोड आंब्याच्या फळाला दगड मारले जातात असे अजित पवार यांनी म्हटल आहे.

लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डान्सला अजित पवारांचा आक्षेप 

अश्लिल डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील काय चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डान्सला अजित पवारांनी जोरदार आक्षेप घेतला होता. दादांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर लावणीस्टार गौतमी पाटीलनं नरमाईची भूमिका घेत त्यांची जाहीरपणे पाणी देखील मागितली होती. 

गौतमी पाटीलची सपशेल शरणागती 

अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटलंय. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करली होती. 

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करू नका

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करू नका असे आदेशच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना दिले होते. राज्यात लावण्यांच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागल्याने गावोगावी आयोजन केलं जाते. त्यामुळे अश्लील डान्स करणा-यांच्या कार्यक्रमांबद्दल राष्ट्रवादीने भूमिका घेतली.  राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. 
गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी केली होती. या तक्रारीनंतर अजित पवारांनी तातडीने पदाधिका-यांना अशा कार्यक्रमांचे आयोजन करु नये अशा सूचना दिल्या होत्या.