बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक सभेला संबोधित करताना ते मराठवाड्याला सर्वात जास्त घाबरतात असं दिसून आलं आहे. अजित पवार यांचं बीडमधील हे भाषण कार्यकर्त्यांच्या बाजूने जास्त, आणि स्टेजवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना झोडपणारं होतं. पण अजित पवारांनी या भाषणात काही मिश्किल वारही केले, त्यांनी आपण मराठवाड्याला घाबरावं लागतं असं म्हटलं आणि त्याचं कारण देखील भाषणात दिलं.
अजित पवार यांना बीड येथील भाषणात बोलताना अचानक असं लक्षात आलं की, मास्कमुळे स्पष्ट आवाज येत सर्वांना जात नाहीय, तेव्हा अजित पवार यांनी आपल्या नाका-तोंडावरचा मास्क खाली घेतला आणि म्हणाले, ''तसा मी मास्क काढतंच नाही, पण काय हे ना, घाबरावं लागतं, कारण मराठवाडा ही माझी सासुरवाडी आहे''.... यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हसण्याची लाटदिसून आली.
या भाषणात अजित पवारांनी म्हटलं आहे, आम्ही आमदार, मंत्री झालो, पण कार्यकर्त्यांचं काय त्यांनी कधी मोठं व्हायचं, त्यांना नको का पद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सभापती कुठं तरी त्यांना पद मिळाली पाहिजेत, ही जनता आपलं काम नीट करते अडचण असते ती स्टेजवर बसलेल्या मंडळीची, म्हणून त्यांनी कधीही यात आठकाठी आणू नये.
नातं गोतं, आणि धंद्याला मदतीचा आहे, म्हणून उमेदवार देऊ नका, योग्य कार्यकर्त्यांना तिकीटं मिळाली पाहिजेत. एक दिलानं काम झालं पाहिजे तेव्हा आपण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकू असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.