सिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज

वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना खडे बोल सुनावले... नाव बदलून, मास्क लावून प्रवास केल्याचं सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा... असं चॅलेंजचं त्यांनी सुप्रियाताईंना दिले आहे.  

वनिता कांबळे | Updated: Aug 2, 2024, 09:34 PM IST
सिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज title=

Ajit Pawar Vs Supriya Sule : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या अजित पवारांच्या वेषांतराचीच चर्चा आहे.. अजितदादा तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी आणि खोट्या दाढी-मिश्या लावून दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांना भेटायला जायचे... असा घणाघाती आरोप विरोधकांनी केला... ए. ए. पवार असं नाव बदलून अजित पवारांनी विमान प्रवास केल्याचं सांगण्यात आलं.. सुप्रिया सुळेंनी त्याला आक्षेप घेत, थेट लोकसभेतच हा मुद्दा मांडला... त्यामुळं अजितदादा चांगलेत संतापलेत... एकतर वेषांतर केल्याचा पुरावा द्या, नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या, असं खुलं चॅलेंज दादांनी सुप्रियाताईंना दिलंय...

'नाव बदलून अजितदादांचा विमानप्रवास कसा?

अजितदादा हे राजकारणातले हरून अल रशीद आहेत... वेषांतराच्या अशा प्रकारामुळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा संजय राऊतांनी काढला... तर वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर राजकारण सोडेन, असं आव्हान अजितदादांनी दिलं.

वेषांतर करून अजितदादांकडून राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ'

एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेत बंड केलं.. त्यावेळी वेषांतर करून आपण जायचो, असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. अजित पवारही दिल्लीत अमित शाहांना भेटायला वेषांतर करुन जायचे, अशी जोरदार चर्चा आहे.. एकूणच काय तर वेषांतरावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय..

वेषांतराच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना खडेबोल

वेषांतराच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेयत...नाव बदलून कधीही प्रवास केलेला नाही...लपून छपून मी प्रवास करत नाही, उथळमाथ्यानं प्रवास करतो...नाव बदलून प्रवास केला हे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन...नाहीतर आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणा-यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी दिलंय...संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांवर आरोप केले होते...त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय...