जयेश जगड, झी मीडिया, अकोला : शिवसेनेने निवडणूक वचननाम्यात दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता करत आज राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शिवथाळीचे लोकार्पण केले. नव्या वर्षापासून म्हणजे जानेवारी महिन्यांपासून राज्यात शिव भोजन योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. वचननाम्यात दहा रुपयांत थाळी देण्याची घोषणा केली होती...त्यानुसार आज अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अकोला सामान्य रुग्णालयात शिव भोजन योजना राबिण्यास सुरुवात झाली आहेय. अकोल्यातील दोन्ही ठिकाणी 150 - 150 ताटांची व्यावस्था करण्यात आलीय.
बच्चू कडू यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण पार पडले. अकोल्याच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर सकाळी साडे नऊ वाजता हा सोहळा पार पडलाय. यावेळी पोलीस दलासह होमगार्डसने यावेळी परेडच्या माध्यमातून सलामी दिलीय. या सोहळ्यात शासनाच्या विविध विभागाचे चित्ररथ आणि देखावे तयार करण्यात आले होतेय.
यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून शासनाच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती दिली तर शासनाच्या योजना जनते पर्यंत पोहचविण्यास गती देण्याचंही म्हंटलंय. या नंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्वातंत्रसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कार्यक्रमासाठी विविध स्तरातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय.