मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या सहलीच्या मिनीबसला झालेल्या अपघाताची कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तशी माहिती कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेय. दरम्यान, राज्य सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. आता पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
२८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वरकडे जाणार्या एका बसचा अपघात आंबेनळी घाटात झाला होता. त्या अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असून, याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रूपये मंजूर केले आहेत.
दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणा-या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात झाला. बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीस समितीची नेमणूक करण्यात आलीय. या समितीत अधीष्ठाता आणि विद्यापीठातील दोन उच्च अधिकारी असणार आहेत. अपघात कसा झाला याची पूर्ण चौकशी करणार आहेत.