Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'

Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Apr 18, 2024, 09:48 PM IST
Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...' title=
Amit Thackeray, Vasant More

Pune News : पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची पुण्यात भेट घेतली. अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं यासाठी ते विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. पुण्यात बोलत असताना अमित ठाकरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांना टोला लगावला. लोकसभेचं तिकीट मिळालं यासाठी वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. राज ठाकरे यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन वसंत मोरे यांनी मनसेला टाटा गुड बाय करून वंचितमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सणसणीत टोला लगावला आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे?

वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावं, असंही अमित ठाकरे यांनी म्हटल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली. मनसेने पाठिंबा दिला त्याबद्दल आभार. मनसेचे एकावेळी पुण्यात २९ नगरसेवक असताना होते. त्यामुळे मनसेची संपूर्ण शहरात चांगली ताकद आहे. त्याचा फायदा होणार आहे. एमआयएमने उमेदवार दिला त्याचा तो निर्णय आहे. राज ठाकरे याचा बॅनरवर फोटो लावण्यात येईल काही ठिकाणी दिसत नव्हता, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तर आज सर्व मनसे पदाधिकारी याच्याशी चर्चा करून पुणे भाजप उमेदवार यांना पाठींबा देण्यासाठी चर्चा झाली. आजपासून राज ठाकरेंचे फोटो महायुतीच्या बॅनरवर दिसतील, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये उद्याचा दिवस प्रचंड राजकीय धामधुमीचा असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार ह्या एकमेकींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉल मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दोघींचे म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येतील. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचेदेखील अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येतील.