अमरावतीत उदयपूरप्रमाणे हत्याकांड? Navneet Rana यांनी अमित शहांना लिहलं पत्र

अमरावतीत औषध व्यापारी उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती

Updated: Jul 2, 2022, 08:33 PM IST
अमरावतीत उदयपूरप्रमाणे हत्याकांड? Navneet Rana यांनी अमित शहांना लिहलं पत्र  title=

अमरावती : अमरावतीत काही दिवसांपूर्वीचं एका औषध व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे या घटनेचा संदर्भ उदयरपुरच्या घटनेशी लावला जात असल्याची माहिती आहे. या हत्येप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. 
  
पत्रात काय? 

अमरावतीत औषध व्यापारी उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणात चोरीची केस दाखल करून 4 आरोपींना ताब्यात घेत हे प्रकरण शांत करण्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच ही घटना उदयपूर हत्याकांडासारखी आहे. तसेच अमरावतीच्या पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन आरती सिहं यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय़ अथवा एनआयए मार्फत चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.  

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. उमेश कोल्हे अमित मेडिकल स्टोअरचं दुकान चालवतात. हे दुकान बंद करून ते त्यांचा मुलगा संकेत कोल्हे व पत्नी वैष्णवीसह स्कूटरने घराकडे जात असताना ही घटना घडली. या हत्याप्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी इरफान खानचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले आहे.

इरफान खान नावाच्या व्यक्तीने उमेशच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी पाच जणांची मदत घेतली. इरफानने त्या पाच जणांना 10 हजार रुपये देण्याचे आणि कारमध्ये सुरक्षितपणे पळून जाण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते,अशी माहिती पोलिसांनी दिली.