ग्रामसभेत प्रश्न विचारला; भर रस्त्यात लाठ्याकाठ्यांनी दोन गटात तुंबळ हाणामारी

Gram Sabha in Hingoli : एक धक्कादायक बातमी. ग्रामसभेत प्रश्नविचारल्यानंतर भर रस्त्यात राडा पाहायला मिळाला.  

Updated: Sep 17, 2021, 10:58 AM IST
ग्रामसभेत प्रश्न विचारला; भर रस्त्यात लाठ्याकाठ्यांनी दोन गटात तुंबळ हाणामारी

हिंगोली : Gram Sabha in Hingoli : एक धक्कादायक बातमी. ग्रामसभेत प्रश्नविचारल्यानंतर भर रस्त्यात राडा पाहायला मिळाला. खरबी गावात काही नागरिकांना एका टोळक्याने भर रस्त्यात लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारले म्हणून ही मारहाण केल्याचा पीडित कुटुंबाने आरोप केला आहे. मारहाण करतांनाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोक काठीने मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या खरबी गावात ग्रामपंचायतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सरपंच गटाचे काही लोक विरोधी गटातील ज्योती पवार यांना त्यांच्या गटात सहभागी करून घेण्यासाठी आमंत्रित करीत होते. यातून वाद झाला. आमच्या गटात का सहभागी होत नाही असे म्हणत या ग्रामपंचायत सदस्य महिलेला सरपंच गटाच्या लोकांनी मारहाण केली. त्यातून वाद उफाळून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. 

याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीत दोन्ही गटातील तिघे जण जखमी झालेत.त्यांच्यावर हिंगोलीतल्या जिल्हा रुगणालयात उपचार सुरूयत. यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी 17 जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.