धक्कादायक, राज्यात या जिल्ह्यात बिटक्वाईनच्या व्यवहारातून हत्या

 Bitcoin dispute News : बिटक्वाईनच्या व्यवहारातून (Bitcoin transaction dispute) एकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

Updated: Sep 17, 2021, 11:17 AM IST
धक्कादायक, राज्यात या जिल्ह्यात बिटक्वाईनच्या व्यवहारातून हत्या title=

नागपूर : Bitcoin dispute News : बिटक्वाईनच्या व्यवहारातून (Bitcoin transaction dispute) एकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माधव पवार याची चार दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. माधव याचे नागपुरातून अपहरण करून वाशिम जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह 12 सप्टेंबर 2021 रोजी सापडला होता. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुख्यआरोपी आणि त्याचे साथीदार फरार आहेत.

वाशिम जिल्ह्याच्या मालेगावजवळ नागपूर- मुंबई महामार्गालगत पांगरीकुटे शेतशिवारात माधव याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी विक्की ऊर्फ विकल्प मोहोड, शुभम ऊर्फ लाला कन्हारकार, व्यंकेश ऊर्फ टोनी मिसन भगत यांना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी निशीद, गज्जू ऊर्फ गजानन मुनगुने आणि एक महिला हे तिघेही पसार आहेत.

मुख्य आरोपी निशीद वासनिक याच्याकडे बिटक्वाईनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक करावी म्हणून माधव पवार हा सेमिनार आयोजित करीत होता. ट्रेड एशियाच्या नावाखाली त्यांचा बिटकॉइनचा हा गोरखधंदा सुरू होता. त्याचवेळी माधव व्यवसायचा हिशेब ठेवीत होता. 

बीटकॉइनच्या व्यवहारात (Bitcoin dispute) माधवने हेराफेरी केल्याच्या वादातून आरोपींनी माधव पवार याचे नागपूर येथील घरून अपहरण केले. त्याला वाशिम येथे रोडच्या बाजूला निर्जनस्थळी उतरविले आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना वाशिम पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.