मतदान कार्ड नसेल तरी सहभागी व्हा लोकशाहीच्या उत्सावात

निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असल्यास बजावू शकता मतदानाचा हक्क

Updated: Oct 21, 2019, 09:55 AM IST
मतदान कार्ड नसेल तरी सहभागी व्हा लोकशाहीच्या उत्सावात  title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. प्रत्येक पक्षाच्या शक्तीप्रदर्शनानंतर अखेर मतदानाचा दिवस उगवला. राज्यात लोकशाही उत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. परंतु आजच्या लोकशाहीच्या उत्सवावर पावसाचे सावट आहे. पवसाचा परिणाम मतदानाच्या टक्क्यांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मतदान करनं प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो त्याने बजावायलाच हवां. मतदान कार्ड नसल्यास लोकशाहीच्या उत्साहात भाग घेणं टाळू नका. तर निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेल्या इतर ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदानाचा अधिकार बजावू शकता.

पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/ राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड), मनरेगा जॉबकार्ड, 

कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड अशा ओळखपत्रांच्या मदतीने तुम्ही मतदानाचा हक्क बाजावावू शकता.