close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'भाजपाला मत देणं म्हणजे पाकिस्तानवर बॉम्ब टाकणं'

मीरा-भाईंदरमध्ये भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

Updated: Oct 14, 2019, 11:20 AM IST
'भाजपाला मत देणं म्हणजे पाकिस्तानवर बॉम्ब टाकणं'

ठाणे : भाजपाला मत देणं म्हणजे पाकिस्तानवर बॉम्ब टाकणं असा अर्थ होतो असे विधान उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी केले आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. या भाषणात त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केल्यान ते चर्चेत आहेत. 

भाजपाला मत द्या आणि पुन्हा आमच्या पार्टीला जनतेची सेवा करण्याची संधी द्या असे ते म्हणाले. तुमच्या मताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कमळ फुलेल आणि पाकिस्तानवर आपोआप परमाणु देखील पडेल असे ते म्हणाले. देवी लक्ष्मी ही हाथ, सायकलवर बसत नाही तर तिचे सिंहासन हे कमळ असून ती त्यावरच विराजमान होते. पार्टीने अनुच्छेद ३७० हटवले.  कमळाच फूल विकासाचे प्रतिक बनला आहे असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.