close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

साताऱ्यातल्या राजांसाठी 'पट्टराण्या'ही प्रचाराच्या मैदानात

साताऱ्यातल्या राजांसाठी मैदानात उतरल्या आहेत या 'जाऊबाई'... तेही जोरात...

Updated: Oct 15, 2019, 10:04 PM IST
साताऱ्यातल्या राजांसाठी 'पट्टराण्या'ही प्रचाराच्या मैदानात

तुषार तपासे, झी २४ तास, मुंबई : साताऱ्याचे दोन्ही राजे सध्या निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक उदयनराजे भोसले तर सातारा विधानसभा शिवेंद्रसिहराजे भोसले जोरदार प्रचार करत आहेत. त्यांच्या जोडीला त्यांच्या राण्याही प्रचाराच्या मैदानात उतरल्यात. 

साताऱ्यातली प्रचाराची रणधुमाळी... राण्यांची... राजांसाठी... उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले प्रचारात उतरल्या आहेत. गावोगावी महिलांशी संवाद साधत त्या उदयनराजेंना निवडून देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. 

दुसरीकडे शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसलेही शिवेंद्रराजेंसाठी प्रचार करताना दिसत आहेत. 

काही काळापूर्वी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजांमध्ये वाद होते. पण आता ते मिटलेत... दोघेही भाजपात आलेत आणि आता त्यांच्यासाठी मैदानात उतरल्या आहेत या 'जाऊबाई'... तेही जोरात...