Assembly Election 2024: विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. पण कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे.
मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील. बाळा नांदगावर हे पक्षाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ते शिवडी विधानसभेचे माजी आमदारदेखील राहिले आहेत. शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करत बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीय.. तर वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी संदिप देशपांडेंना तिथून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वरळीसह दक्षिण मुंबईत मनसेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मराठी बहुल भागात मराठी माणसांच्या नोकऱ्या, घरांचे प्रश्न मनसेकडून सातत्याने मांडण्यात येतात. दरम्यान आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या रणनीतीने मैदानात उतरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही,असे विधान राज ठाकरेंनी केले. पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरु आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या, असे राज ठाकरे सोलापूर दौऱ्यात म्हणाले.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.