नाशिकमध्ये गावगुंडांच्या टोळ्यांकडून सामान्य नागरिकांना मारहाण

झी 24 तासच्या प्रतिनिधीला मारहाण

Updated: Aug 21, 2018, 10:52 AM IST
नाशिकमध्ये गावगुंडांच्या टोळ्यांकडून सामान्य नागरिकांना मारहाण title=

नाशिक : नाशकातल्या गावगुंडांना आवर घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेफाम गावगुंडांच्या टोळ्यांकडून रस्त्यावर सामान्य नागरिकांना निष्कारण मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. दारूच्या नशेत बेधुंद गाडी चालवणाऱ्या काही तरुणांनी धक्का लागल्याचं कारण देऊन झी २४ तासचे प्रतिनिधी किरण ताजणे यांना दिवसाढवळ्या मारहाण केली. 

झी २४ तासच्या प्रतिनिधी कुठलही चूक नसताना गावगुंडांच्या या उच्छादाला बळी पडावं लागलं. गावगुंडांची ही दादागिरी सीसीटिव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसते आहे. याप्रकऱणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.