विशाल करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: आपल्याला सतत काळजी असते ती म्हणजे परीक्षांची (How to Relax On the Exam Day). परीक्षा जवळ आल्या की आपण कायमच जोरदार तयारी करायला लागतो. आपल्याला अभ्यासाच्या वेळी अनेक ताणताणावतून सामोरे जावे लागते. कधी कधी आपल्याला हा तणाव असहय्य होतो परंतु अनेकदा आपल्याला परीक्षेनंतर येणाऱ्या (Exam Tensions Relief Remedies) निकालामुळे अजून तणाव येतो. त्यातून जर वेबसाईटचाच काही प्रोब्लेम असेल तर आपल्यालाही याचा तोटा सहन करावा लागतो. सध्या अशाच एका समस्येवरून न्यायलयानं (Court) आपला आदेश जाहीर केला आहे. तेव्हा जाणून घेऊया संपुर्ण प्रकरण.
नीटच्या विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीशी नक्की कोण खेळतंय असा सवाल औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या माध्यमातून होणारा त्रास हे आहे. याबाबत खंडपीठात तीन याचिका दाखल झाल्या होत्या त्यावर बोलताना खंडपीठांना अशा पद्धतीने नाराजी वर्तवली. परीक्षेबाबत योग्य जनजागृती करा अशा पद्धतीचे आदेश खंडपीठाने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला सुद्धा दिले.
हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वेबसाईटवर (UGC Website) अनेकांना त्यांचेच वेगवेगळे गुणपत्रक पाहायला मिळाले, त्यामुळे ही वेबसाईट हॅक झाली की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता, याबाबत तक्रारी करूनही दाद मिळाली नसल्याने काही विद्यार्थ्यांनी खंडपीठात याचिका केली होती, विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर सुद्धा तातडीने लक्ष देण्याची आदेश कोर्टाने दिले आहेत. देशभरात अशा अनेक घटना घडल्या आल्याच यावेळी कोर्टाने सांगितलं.
हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक
या प्रकरणानंतर आता अशा प्रकारांवर लवकरच आळा घातला जाईल अशी आशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना आहे. सततच्या या प्रकारांमुळे विद्यार्थींही (Students) त्रस्त झाले आहेत त्यामुळे आता कोर्टाच्या या आदेशामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.