Fire News: औरंगाबादेत वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला सोमवारी सकाळी 12 वाजता आग लागली. आग्निशमन दलाचे दोन वाहन घटनास्थळी पोहचले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून कंपनीच्या शेजारी अनेक घरे देखील आहे. ही आग नेमकी कशी लागली यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
औरंगाबादमध्ये वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत 'चटाई कंपनी' आहे. या कंपनीला १२ च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की दुरून आगीचे लोट दिसत होते. या घटनेत कंपनीतील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बंब घटणस्थळी दाखल झाले आहे.
औरंगाबादेत अग्नितांडव; वाळूज एमआयडीतील प्लास्टिक चटई कंपनीला भीषण आग pic.twitter.com/6aiAKJjhpI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 16, 2023
वाचा: जेव्हा 'विराट' क्रीझवर असतो तेव्हा..., कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी
ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. कंपनी सुरू असतांना ही आग लागली. दरम्यान, यावेळी कंपनीत काही कामगार देखील होते. या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरातील टँकर आणि अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले आहेत. या कंपनीत चटई बनवण्याचे काम सुरू होते.