Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. बच्चू कडू हे महायुतीत नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा... नारा दिला आहे. विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये चर्चा करून महाराष्ट्रात मजबूत उमेदवार उभा करुन 20 जागा लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले. आम्ही वेगळ लढण्यात पटाईत आहोत.
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला गरज आहे. त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा...असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला.
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील कुरबुरी पहायला मिळत आहेत. ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केलीये...शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक झाली...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 288 जागांच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत...लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केलीये...लोकसभेच्या निकालावरून मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला आहे.