आईचे निधन झाल्याचा बहाणा करत ओलाचालकला लुटलं

चार चोरट्यांनी बनाव करुन ओलाचालकालाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय.

Updated: Aug 10, 2018, 11:19 PM IST

बदलापूर : चार चोरट्यांनी बनाव करुन ओलाचालकालाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय. बदलापुरात जे घडलं, ते धक्कादायक होतं. आमचा हा रिपोर्ट पाहा आणि सगळ्यांनीच सावध राहा... रात्री अपरात्री प्रवाशांना घरी सोडण्यासाठी तत्पर असलेल्या ओला चालकांसाठी रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरू लागलाय. 

गाडीत घात झाला

ओलाचा चालक श्रवण यादव रविवारी रात्री बदलापूरच्या जान्हवी लॉन्स परिसरात एका प्रवाशाला सोडण्यासाठी आला होता. तिथून परतत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर चार जण आले आणि त्यातल्या एकाची आई वारली असल्याचा बहाणा करत पुढे सोडण्याची विनंती केली.  श्रवणने त्यांना गाडीत घेतलं आणि घात झाला.