ठाण्यात बसपा नेत्याकडून मतदान केंद्रावर शाई फेकून निषेध

बसपा नेते सुनील खांबे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला.  

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 21, 2019, 07:37 PM IST
ठाण्यात बसपा नेत्याकडून मतदान केंद्रावर शाई फेकून निषेध title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना घडल्या. यात ठाणे येथे बहुजन समाज पार्टीचे (बसपा) नेते सुनील खांबे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले असताना ईव्हीएमवर शाई फेकली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मतदान केंद्राबाहेर काढले.

सुनील खांबे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. ते ज्याठिकाणी मतदानासाठी ईव्हीएम ठेवले होते. तेथे ते गेले. त्यांनी मतदान केल्यासारखे करत अचानक ईव्हीएमवर शाई फेकली. त्यानंतर उपस्थित अधिकारी यांच्या टेबलावरही शाही फेकली. यावेळी मतदान केंद्रासाठी मतदान सुरू होते. तसेच बाहेरही मतदानासाठी लोक रांगेत उभे होते. मतदान केंद्राच्या आत ही घडामोड झाल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

सुनील खांबे यांना पोलिसांनी बाहेक काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी "ईव्हीएम मुर्दाबाद" आणि "ईव्हीएम नही चलेगा" अशी घोषणा देत दिल्या. त्यांनंतर पोलिसांनी खांबे यांना पोलिसांनी केंद्राबाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले.