मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय. 

वनिता कांबळे | Updated: Sep 8, 2024, 07:51 PM IST
मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?  title=

Ajit Pawar :  महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये  शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळेंनी त्यांची नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला कुणाचा ? याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळालं. सुनेत्रा यांचा पराभव अजित पवारांसाठी हा फार मोठा धक्का होता.. तसेच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची असल्यानं बारामतीमध्ये अजित पवारांनी या पराभवाबाबत खंत व्यक्त केलीय. 

लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं पहायला मिळतंय...बारामतीमध्ये आज अजित पवारांनी पराभवाबाबत खंत व्यक्त केली...यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे म्हणजे कामांची तुलना करता येईल असं ते म्हणाले...तर, सुनिल तटकरेही परवा म्हणाले हे काय झालं...असा दाखलाही अजित पवारांनी यावेळी दिला...त्याचबरोबर एवढा विकास करूनही बारामती हरल्याची खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली...तर उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवारांनाच निवडणूक लढवण्याची विनंती करत गोंधळ घातला...

पुढच्या काळात देखील आपल्याला बारामतीचा याच पद्धतीनं विकास करायचाय. मात्र, ते तुमच्या हातात आहे. मी पण शेवटी माणूस आहे. एवढी सर्व कामे करून बारामतीकर वेगळा निर्णय देऊ शकतात तर झाकली मूठ सव्वालाखाची म्हणायचं अशी टिप्पणी अजित पवारांनी केलीय.  आगामी निवडणुकीबाबत अजितदादांनी सूचक विधान करताच सममर्थकांनी, आम्हाला बारामतीत दुसरा आमदार नको ,म्हणत अजित पवार तुम आगे बढो, एकच वादा अजित दादा अशा घोषणा द्यायला सुरूवात केली