'नारायण राणे जे करतील त्याला शुभेच्छा'

तीन महिन्यांच्या आत कोपर्डीमधील आरोपीना फाशी झाली नाही तर, रस्त्यावर उतरुन लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय.

Updated: Sep 20, 2017, 09:24 PM IST
'नारायण राणे जे करतील त्याला शुभेच्छा' title=

सांगली : तीन महिन्यांच्या आत कोपर्डीमधील आरोपीना फाशी झाली नाही तर, रस्त्यावर उतरुन लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. त्या सांगलीत बोलत होत्या. तसंच आज मिरजमध्ये त्यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिल्या.

नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, ते जे करतील त्याला आमच्या शुभेच्छा आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलीय. तसंच सत्तेच्या राजकारणाचा मोह नाही. सत्तेबाहेर राहूनही चांगली कामं करता येतात असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर सणासुदीच्या मुहूर्तावर गरिबांची साखर बंद करणं हा कुठला शहाणपणा आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.