भोंगा वाद : राज ठाकरे यांना गृहमंत्र्यांकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण

Raj Thackeray : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण देणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Updated: Apr 20, 2022, 03:46 PM IST
भोंगा वाद : राज ठाकरे यांना गृहमंत्र्यांकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण title=

मुंबई : Raj Thackeray Invited to an all-party meeting : सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मी सर्व विरोधी पक्षांचे नेते आणि संघटनांची बैठक घेणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. कोणताही कायदा हातात घेऊ नका. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण देणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

सीसीटीव्हीबाबत सरकारची भूमिका नाही, लोकांनी ते स्वत: बसवले आहेत. कोणी लाड करुन स्पीकर काढत असेल तर त्यांचे स्वागत आहे. स्पीकरला हटवण्याची जबाबदारी सरकारची नाही. पोलिसांच्या परवानगीने लाऊड ​​स्पीकर लावावेत, असे आवाहन गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नियम राज्य सरकारच्या नियमांनुसार व्हायला हवेत. सरकारने काय करावे हा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेचा टीझर रिलीज झाला झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हा टीझर रिलीज केलाय.  राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेला परवानगी देऊ नका, वंचितसह पाच संघटनांचं पोलिसांना पत्र दिले आहे. सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. मशिदींवरील भोग्यांनंतर मनसेच्या रडारवर आता प्रार्थनास्थळांमधील सीसीटीव्ही आले आहेत. मदिरांमध्ये सीसीटीव्ही बसवले जातात तर मग मशिदींमध्ये सीसीटीव्ही का बसवले जात नाहीत असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांनी थेट ट्विट करून ही याबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जवळपास सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. परंतु मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांत सीसीटीव्ही यंत्रणा का असू नये ? सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. सरकारनं याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
 
तर दुसरीकडे औरंगाबादमधील भोंग्याबाबत पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावंच लागेल, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. प्रार्थनास्थळांवर असलेल्या भोंग्यांना परवानगी घेणं आवश्यक आहे, असे ते म्हणाले. परवानगी घेण्यासाठी मुदत दिली जाणार  आहे. सोशल मीडियातील पोस्टवरही पोलिसांची करडी नजर आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी सावध व्हावे तसेच नागरिकांनाही सजग राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.