Sharad Pawar : इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्स्प्रेसची दिशा निश्चित झालीय. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं ठरल्याचं स्वतः शरद पवारांनीच जाहीर केलंय.
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिल्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवारांनी केलीय. त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्तही काढण्यात आलाय. विधान परिषदेचे माजी सभापती दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांसोबत राहिले. खरं तर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता. अजित पवार महायुतीत असूनही साताऱ्यात भाजपच्या नेत्यांकडून रामराजेंना त्रास दिला गेला. त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात उघड भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हातात तुतारी घेण्याचे संकेत दिलेत.
शरद पवारांनी फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि रामराजेंच्या हाती तुतारी देण्याचा मुहूर्त काढलाय. त्या कार्यक्रमाची जाहीर घोषणाही शरद पवारांनी केलीय. शरद पवारांनी माढ्यातही अजित पवारांना धक्का देण्याची रणनिती आखलीये. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंनी आधीच अजितदादांची साथ सोडल्याचं जाहीर केलंय. तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही तुतारी घेण्यास आतूर झालेत. शरद पवारांची गेल्या काही दिवसांतली आक्रमक रणनिती अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का देणार याचे स्पष्ट संकेत मिळालेत. त्यामुळं फलटणमधून शरद पवारांची तुतारी एक्स्प्रेस कोणत्या दिशेला धावणार याची उत्सुकता आहे.
AUS
(29 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.