ठाण्यात मध्यरात्री बाईक पेटवल्या, नऊ गाड्या जळून खाक

हा प्रकार कुणी आणि का केला याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू  

Updated: Dec 6, 2018, 11:41 AM IST
ठाण्यात मध्यरात्री बाईक पेटवल्या, नऊ गाड्या जळून खाक

ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा नागरिकांत दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात रात्री ३.३० वाजल्याच्या सुमारास ९ दुचाकी गाड्या पेटवण्यात आल्या. पाचपाखडीतल्या कौसल्या रुग्णालयासमोर हा प्रकार घडला. आग लावून अज्ञात इसम पळून गेले. तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळालं.

नागरिकांत दहशतीचं वातावरण
नागरिकांत दहशतीचं वातावरण 

या घटनेत कौशल्या हॉस्पीटलसमोर असलेल्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या नऊ टू व्हीलर जळून खाक झाल्यात. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक रस्त्यावर लागलेल्या या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. 

हा प्रकार कुणी आणि का केला याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.