शाळांसाठी आंबेडकर-फुलेंनी भीक मागितली, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

शाळांसाठी (School) बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. 

Updated: Dec 9, 2022, 06:31 PM IST
 शाळांसाठी आंबेडकर-फुलेंनी भीक मागितली, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद title=

औरंगाबाद : राज्यात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरुच आहे. यामुळे राज्यातील वातावरण (Maharashtra Politics) पेटून उठलंय. अशी परिस्थिती असतानाा दुसऱ्या बाजूला मंत्री चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शाळांसाठी (School) बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. त्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (bjp chandrakant patil says babasaheb ambedkar and mhatma phule his begged for school at aurangabad marathi news)  

पाटील काय म्हणाले?  

"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

"अपमान करण्याची स्पर्धाच सुरू"

दरम्यान पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे वक्तव्य येत आहेत.अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..!", असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.