तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप नगरसेवकांचा संताप

 तुकाराम मुंढे यांच्या भेटीला गेलेल्या भाजप नगरसेवकांचा आपला  संताप आयुक्तानवर काढला.  

Updated: Feb 18, 2020, 09:42 PM IST
तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप नगरसेवकांचा संताप

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीला आज भाजप नगरसेवक गेले होते. प्रभागातील विकास कामे राखडल्यामुळे भाजप नगरसेवकांचा आपला  संताप आयुक्तानवर काढला. कार्यादेश काढूनही तुकाराम मुंढे यांनी विकास कामांच्या फाईल्स मंजूर केल्या नाहीत, असा भाजप नगरसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी हे नगरसेवक गेले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक आणि पालिका आयुक्त यांच्यात आता संघर्षाची ठिणगी पडली आहे.

कार्यादेश झालेल्या फाईलस मंजूर करत नसल्याचा आरोपही भाजप नगरसेवकांनी केला. आताच्या भेटीसाठीही अपुरा वेळ दिल्याबाबत रोषही या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे नगरसेवकांशी संवाद साधत नाहीत. एक चाकी  सायकल चालवत असल्याचे टीकास्त्र भाजप नगरसेवकांनी केले आहे.

आज आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपमधील संघर्षाची पहिली ठिणगी पडलेली दिसून आली. यावेळी आयुक्तांसोबत भाजप नगरसेवकांनी भेट घेतली. मात्र, आम्हाला अपुरा वेळ दिला. तसेच आयुक्त हे अनेक फाईल्स मंजूर करत नाहीत, अशी तक्रारी माजी महापौर आणि नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक पिंटू झलके यांनी केली.