हे माझं चुकलं का..? भाजप नगरसेवकाची स्वपक्षावर नाराजी

पिंपरी चिंचवड राजकारणात खळबळ

Updated: Mar 23, 2021, 11:10 AM IST
हे माझं चुकलं का..? भाजप नगरसेवकाची स्वपक्षावर नाराजी title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) स्थायी समिती अध्यक्ष पद देण्याचे वचन देऊन ही ते दिले गेले नाही यामुळे नाराज झालेल्या भाजप नगरसेवक रवी लांडगे (Ravi Landge)  यांनी भोसरीमध्ये फ्लेक्सबाजी करत पक्षा विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. (Ravi Landge question to BJP, Poster goes viral on Social Media)  त्यांच्या या फ्लेक्सबाजीमुळे पिंपरी चिंचवड राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी भोसरीतीलच नगरसेवक नितीन लांडगे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी स्थायी समिती  सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजप अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यावर शब्द फिरवल्याची टीका केली. मात्र एवढ्यावर रवी लांडगे यांनी भोसरीमध्ये फ्लेक्सबाजी करत पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली.

काय म्हटलंय बॅनरवर?

वडिलांनी भाजपचा पाया शहरात रोवला चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला मी ही पक्षनिष्ठ राहिलो हे माझे चुकले का असा सवाल रवी लांडगे यांनी पक्षाला केला..! सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केल हे माझे चुकले का असा तिखट प्रश्न रवी लांडगे यांनी फ्लेक्समधून पक्षाला विचारलाय..! रवी लांडगे यांच्या पक्षावरच्या उघड नाराजीच्या या पोस्ट सोशल मिडियावर ही चांगलेच व्हायरल झालेत. रवी लांडगे यांच्या या बंडामुळे पक्षाची डोकेदुखी तर वाढलीच मात्र भाजप आमदार शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या भोसरीतील वर्चस्वाला ही चांगलाच हादरा बसला आहे.