चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (kasba peth assembly constituency) जागेसाठी 27 मार्च रोजी पोटनिवडणुक (bypoll election) पार पडणार आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे भाजप (BJP) मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात आजारी खासदार गिरीश बापट (girish bapat) हे सुद्धा सक्रिय झाले आहेत. नाकात ऑक्सिजनची नळी आणि बोटाला ऑक्सिमीटर लावून व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात गुरुवारी उपस्थित होते.
यावरुन आता विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. दुसरीकडे गिरीश बापट हे आजारी असून देखील भाजप निवडणुकीच्या प्रचारा करता त्यांना घेऊन जात असल्याची बाब अत्यंत चुकीची आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी दिली आहे. आजारी माणसाला कामा लावणं हे चुकीच आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. निफाड दौऱ्यावर असताना भुजबळ यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
"मी त्यांना खूप दिवसानंतर त्यांना पाहिले. वर्तमान पत्रात पाहिल्यानंतर मला सुद्धा शॉक बसला. अशा परिस्थितीमध्येही त्यांना तिकडे आणलं म्हणजे भाजपने ही निवडणूक फारच मनावर घेतली आहे. मागच्या निवडणुकांमध्ये त्यांना जो फटका बसला त्यामुळे ते जास्त सावधगिरी बाळगत आहेत. मतदानासाठी आणलं ते ठिक होतं पण आता प्रचारासाठी अशा लोकांना उतरवत आहात याचे मला आश्चर्य वाटते. प्राण्यांना सुद्धा असं कोणी करायला लागलं तर असं करु नका असे आपण सांगतो. हे त्यापेक्षा भयानक दिसत आहेत. आजारी माणसांना आपण काम करायला सांगतोय," असे छगन भुजबळ म्हणाले.
ऑक्सिजन नळी आणि व्हील चेअरवर गिरीश बापट आले कार्यकर्त्यांना संबोधण्यासाठी; छगन भुजबळ यांची भाजपवर टीका... @ChhaganCBhujbal @NCP #Pune #KasbaBypoll pic.twitter.com/DqRFDG0I0O
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 17, 2023
दरम्यान, गुरुवारी गिरीश बापट यांनी आजारी असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देषून एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी खूप काम करा, कसब्यात विजय नक्की आहे असा संदेश दिला आहे