close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'चंपा शब्द भाजप मंत्र्याचा' अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वारंवार चंपा असा उल्लेख केला

Updated: Oct 19, 2019, 12:59 PM IST
'चंपा शब्द भाजप मंत्र्याचा' अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वारंवार चंपा असा उल्लेख केला. चंद्रकात पाटील याचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं. पण चंपा हा शब्द माझा नाही, तर भाजपच्या मंत्र्यांचा आहे, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. तसंच निवडणुकीनंतर या मंत्र्याचं नाव सांगू असंही अजित पवार म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील जेव्हा भेटतील तेव्हा त्यांना या मंत्र्याचं नाव आपण सांगणार आहोत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. चंद्रकांतदादा तुम्ही ज्या मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसता, त्याच शाहण्याने चंपा हा शब्द पहिल्यांदा वापरला, असं आपण दादांना सांगू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.

आमच्या एका सहकाऱ्याला घेऊन कामासाठी मी या मंत्र्याकडे गेलो. तुमची शिफारस असेल तर काम होईल, असं माझ्या सहकाऱ्याने या मंत्र्याला सांगितलं. पण चंपा माझं ऐकत नाहीत, असं या मंत्र्यानं सांगितलं, त्यावेळी मला चंपा या शब्दाचा अर्थ कळला, असं अजित पवार म्हणाले.