संवाद यात्रेत भाजप आमदार शेकऱ्यांवरच भडकले

ही धक्कादायक बातमी औरंगाबादमधून आहे. सरकारची शिवार संवाद यात्रा सुरु आहे, या यात्रेदरम्यान औरंगाबादचे भाजपचे आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच भडकले. 

Updated: May 29, 2017, 11:49 AM IST
संवाद यात्रेत भाजप आमदार शेकऱ्यांवरच भडकले title=

औरंगाबाद : ही धक्कादायक बातमी औरंगाबादमधून आहे. सरकारची शिवार संवाद यात्रा सुरु आहे, या यात्रेदरम्यान औरंगाबादचे भाजपचे आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच भडकले. 

पैठणच्या शिवार संवाद यात्रेत हा प्रकार घडला. शेतकऱ्यांनं अनुदानावर प्रश्न विचारताच आमदार भडकले, आणि आमचं ऐकायचं नसेल, तर चालते व्हा, असा दमच शेतकऱ्यांना भरला.

खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपने ही यात्रा काढली आहे, मात्र सत्ताधारीच या यात्रेत सामान्य शेतकऱ्यांवर भडकत असल्यांचं दिसतं. यापूर्वीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.