भाजपला मोठा धक्का, बंडखोराने दिला पक्षाचा राजीनामा

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीने पक्षात उचल खाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  

Updated: Oct 5, 2019, 07:29 PM IST
भाजपला मोठा धक्का, बंडखोराने दिला पक्षाचा राजीनामा title=
संग्रहित छाया

धळे : उत्तर महाराष्ट्रातील भाजपची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन सरसावले आहेत. मात्र,  त्यांना अपयश आले आहे. बंड करणाऱ्या उमेदवारानेच पक्षाला रामराम करत भाजपलाच मोठा दे धक्काच दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठी आहे. मात्र, बंडखोरीने पक्षात उचल खाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. धुळ्यातून भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ. माधुरी बोरसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे.

डॉ. माधुरी बोरसे यांनी आपण धुळे शहरातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणाच असा निर्धार केला आहे. त्यामुळे डॉ. बोरसे यांनी धुळे शहरातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी बंड थोपविण्याचे प्रयत्न केले मात्र, ते अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन बंडखोरी रोखण्यासाठी सरसावले आहेत. अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार असा दौरा करत ते पक्षातल्या बंडखोरांशी चर्चा करत आहेत. मात्र, धुळे शहरात याचा फटका भाजपलाच बसला आहे. बंड करणाऱ्या बोरसे यांनी पक्षाचाच राजीनामा दिला.

सात तारखेच्या मुदतीपूर्वी अधिकाधिक बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचे आव्हान भाजपेसमोर आहे. बंडखोरी केल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा महाजनांनी दिला आहे. मात्र, डॉ. माधुरी बोरसे यांनीच पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे हकालपट्टीचा इशारा देऊनही भाजपला याचा लाभ होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.