राज्यात 40 विद्यमान आमदारांना भाजप नारळ देणार ??

राज्यात जवळपास 40वर आमदारांना डच्चू देण्याची भाजपची तयारी सुरु आहे.

Updated: Jun 4, 2019, 08:27 PM IST
राज्यात 40 विद्यमान आमदारांना भाजप नारळ देणार ?? title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेना भाजप युतीने 8 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत, त्यात प्रामुख्यानं भाजप शिवसेनेनं लातूर आणि उस्मानाबादचा उमेदवार बदलला होता. त्यामुळं तिथंही विजय मिळवता आला. हेच समिकरण पुढे चालू ठेवत यावेळी भाजप राज्यात 40 वर विद्यमान आमदारांना नारळ देत नवे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणूकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भाजपची नजर आता राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकांवर आहे. खासकरून मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा जिंकत भाजप-शिवसेनेनं चांगल यश मिळवलंय.  भाजप शिवसेनेचा उमेदवार बदण्याचा निर्णय यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. अखेरच्या क्षणी भाजपनं लातूरचा तर शिवसेनेनं उस्मानाबादच्या विद्यमान खासदारांना डच्चू देत नवे उमेदवार दिले आणि हे उमेदवार निवडूनसुद्धा आले.  याच धर्तीवर भाजप राज्यासह मराठवाड्यातही काही विद्यमान आमदारांना डच्चू देणार आहे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. राज्यात जवळपास 40वर आमदारांना डच्चू देण्याची भाजपची तयारी सुरु आहे.

उमेदवार बदलण्याची निकष, आमदारांबदृल असणारी मतदारांची मत, त्यांची निवडून येण्याची क्षमता, त्यांनी केलेली काम, सरकारच्या योजनांचा त्यांनी केलेला प्रचार आणि राबवलेली .यंत्रणा या सगळ्यांबाबतचा सर्वै भाजपनं केलाय.. त्यानुसार मराठवाड्यातील काही आमदारांना डच्चू देणार आहे, गेल्या वेळी जिथं पराभव झाला तिथंही नवे चेहरे देण्यात येणार आहे.

औऱंगाबादचा विचार करता औरंगाबादेत सध्या भाजपचे 3 आमदार आहेत, त्यापैकी औरंगाबाद पुर्वची अतुल सावेंची जागा भाजपला कमजोर वाटतेय. सध्या तिथं मिळालेली एमआयएमला मतं आणि अतुल सावेंचा प्रभाव या गोष्टींचा विचार करता सावेंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर सिल्लोडमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार भाजप प्रवेश कऱणार आहे त्यांना तिकीट मिळू शकते.

बीडमध्ये भाजपचे पाच आमदार आहे, त्यापैकी केज मतदारसंघातील आमदार संगिता ठोंबरे आणि माजलगावचे आर टी देशमुख यांना नारळ मिळण्याची शक्यता सांगण्यात येतेय. संगिता ठोंबरे यांना भाजपचा अंतर्गत विरोध कारणीभूत ठरू शकतो. त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. देशमुखांची प्रकृती आणि मतदारसंघांतील संपलेला प्रभाव कारणीभूत ठरू शकतो.

जालन्यात रावसाहेब दानवेंचा प्रभाव आहे, त्यात बदनापूरची नारायण कुंचेंही जागा धोक्य़ात आहे, त्यामुळं भाजप इथंही निर्णय घेवून उमेदवार बदलू शकतो...नांदेड, परभणी, हिंगोली इंथही काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.. लोकसभेत बदलाचा निर्णय़ योग्य ठरला. विधानसभेत याबाबत मुख्यमंत्री निर्णय़ घेवू शकतात असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तासशी बोलतांना सांगितले.

याबाबत भाजपमध्ये खलबंतही सुरु झाली आहे, सुत्रांच्या माहितीनुसार काही सर्वै भाजपनं केली आहेत, त्यात 40 लोकांची जरी यादी आली असली तरी किमान 25 जागांवर भाजप ठाम असल्याचं कळतं, याबाबत भाजप प्रदेशअध्यक्ष मात्र सध्या काही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. येणारी विधानसभा भाजपसाठी महत्वाची आहे, युतीच्या समिकरणानुसार ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असंही होवू शकतं त्यामुळं जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप शक्ती लावणार आहे. त्यात रावसाहेब दानवे विधानसभा निवडणूकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळं प्रभाव दाखवण्यासाठी दानवेही जोर लावणारच. त्याचाच भाग म्हणून उमेदवारीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.