मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'व्हिडीओ बॉम्ब' फोडल्यानंतर राजकीय वातावरण तापले. देवेंद्र फडणवीस यांना सायबर विभागाने नोटीस पाठवून चौकशीला बोलावले.
भाजपने राज्यात आंदोलन करून या नोटीसची होळी केली. या आंदोलनावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ट्विट केलंय.
खा. संजय राऊत यांनी 'कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? असा सवाल केलाय.
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का? असा सवालही राऊत यांनी भाजपला केलाय.