माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Jul 21, 2017, 02:07 PM IST
माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू  title=

शहापूर : माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

मृत्युमुखी पडलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव राजेश दिलीप गोकर्ण असल्याचं समजतंय. राजेश हा कल्याणमधील बेतूरकरपाड्याचा रहिवासी आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

आपल्या चार मित्रांसोबत राजेश माहुली परिसरात धबधब्याचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी आला होता. परंतु, धबधब्याच्या डोहात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेशच्या मित्रांनाही अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं चांगलाच धक्का बसलाय. 

शहापूरजवळच्या माहुली किल्ला परिसरातील वन्यजीव विभागाने पर्यटकांसाठी खुल्या केलेल्या धबधब्यात मृत्युमुखी पडलेला राजेश हा तिसरा पर्यटक ठरलाय. याआधी याच महिन्यात या भागात दोन पर्यटकांचे मृत्यू झालेत.