आग लागली तेव्हा सगळे पळाले, पर्स आणायल्या गेलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू

एक धाकादायक घटना घडली. एका इमारतीला आग (Building fire) लागली. आग लागल्याचे कळताच सर्व जण जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पडले. मात्र...

Updated: Jan 7, 2021, 08:31 PM IST
आग लागली तेव्हा सगळे पळाले, पर्स आणायल्या गेलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : एक धाकादायक घटना घडली. एका इमारतीला आग (Building fire) लागली. आग लागल्याचे कळताच सर्व जण जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पडले. मात्र, इमारती बाहेर पडलेली एक महिला (Woman) आपली पर्स आणि साहित्य आणणायला पुन्हा इमारतीत गेली. मात्र, तोपर्यंत आगीचा ( fire) मोठा भडका उडाला आणि त्या खोलीत अडकल्या. आग सर्वत्र पसरताच त्यांना बाहेर पडता आले नाही. अखेर आगीने त्यांचा जीव घेतला.

सदर भागामधल्या छावणी परिसरात लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला. लताबाई काठरपवार असे मृत महिलेचं नाव आहे. बाईकवरील पॉलिश विक्रीच्या दुकानात आग लागली होती. त्या दुकानात लताबाई काठरपवार साफसफाईचे काम करायच्या. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा इतरांसह त्या सुद्दा बाहेर पळाल्या होता. मात्र नंतर पर्स आणि इतर साहित्य आणायला त्या पुन्हा इमारतीत शिरल्या आणि आगीत अडकल्या. 

एका कपाटामागे जळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना आढळला. ही आग दुकानाच्या दुमजली इमारतीपर्यंत पोहोचली होती. त्यात दुकानातलं केमिकल जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.