लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली.

Updated: Aug 2, 2022, 02:50 PM IST
लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर  title=

पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. हा मुद्दा धरून विरोधी पक्ष नेते शिंदे सरकारवर सतत चौफेर टीका करतायत. या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.लवकरचं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्य़ाचे एकनाथ शिदे यांनी सांगितले आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.  यावेळी शिंदे यांनी बैठकित आढावा घेतलेल्या मुद्यांचीही माहिती दिली. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, धरणाच्या पाणी साठा, नुकसानीच पंचनामे यासह अनेक मुद्यांवर त्यांनी बैठकीत चर्चा केल्याचे सांगितले. 

शासन स्थरावर अडकलेल्या योजनांना गती मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेतली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर होतील असे आश्वासन दिले. तसेच पंचनामे 100 टक्के लवकर होतील आणि शेतकऱ्याना दिलासा द्यायचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे य़ांनी सांगितले.  

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकरचं होईल अशी चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे सरकारला विरोधी पक्ष टार्गेट करत होते. दोघांचे सरकार राज्यात चालत असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. यावर सरकार लोकांच्या हिताचं काम करतोय.सरकार दबावाखाली काम करत नसून लवकरचं मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.  

जनतेला आवाहन 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम देशात सुरु केली आहे. या मोहिमेला उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.