close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्याच्या एनडीएवर गैरव्यवहाराचा किटाळ

देशाच्या संरक्षण दलांसाठी अधिकारी घडवले जातात अशी अतिशय सन्माननीय संस्था म्हणजे पुण्यातली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी...

Updated: Jun 6, 2018, 06:05 PM IST

पुणे : देशाच्या संरक्षण दलांसाठी अधिकारी घडवले जातात अशी अतिशय सन्माननीय संस्था म्हणजे पुण्यातली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी... मात्र आता या संस्थेवरच गैरव्यवहाराचा किटाळ आलाय. प्राध्यापक भरती गैरव्यवहाराप्रकरणी एनडीएच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल केलाय. राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक, रसायनशास्त्र,गणित विभागाचे सह प्राध्यापक, आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्याविरोधात प्राध्यापक भरतीत गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.